Posts

Showing posts from January, 2023

ईश्वर दगडातला!!

  माणूस घडवताना ईश्वराला  काय सुचलं कुणास ठावूक हृदय दिलं मस्तक दिलं सोबतीला दिली न शमणारी भूक भुकेने दिला स्वार्थास जन्म अन् घडवलेला माणूस पशू झाला भूक काही शमली नाही ईश्वरालाच तो विकावया निघाला पाहून आपला मांडलेला बाजार बिचाऱ्या ईश्वराचा जीव खचला सुचेनासे झालं काय करावं निर्जीव दगडात लपून बसला!!.. - मंगेश..